Skip to content Skip to footer

शहरात महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रम

अहमदनगर /प्रतिनिधी : महाशिवरात्री निमित्त शहरातील विविध शंकरांच्या मंदिरात भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होते. पहाटे अभिषेक, पूजा, महाआरती तसेच विविध ट्रस्ट, संघटना, संस्था व मंडळांच्या वतीने महाप्रसाद, फळांचे वाटप करण्यात आले. मंदिर परिसरात हार, फुले, बेलाची पाने आदींची दुकाने थाटली होती. तसेच अनेक मंदिरात धार्मिक कार्याबरोबरच विविध कीर्तनकार, प्रवचनकारांच्या कीर्तनांचे आयोजन करण्यात आले होते.

महाशिवरात्रीनिमित्त माळीवाडा येथील रिक्षा स्टॉप, गणपतीची तालीम यांच्या वतीने श्री शंकराच्या मूर्तीची स्थापना करुन संगमनाथ महाराज यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी नीलेश खरपुडे, बजरंग भुतारे, विष्णूपंत म्हस्के, सतीश डागवाले, बाळासाहेब आरडे, विनायक आंबेकर, बाबू कावरे, सखाराम घोडके, नवनाथ पवार, सुरेश इवळे, महेश आंबेकर, किरण दळवी, भाऊ जाधव, संजय गायकवाड, बाबा पटवेकर, रवी रांधवणे, सुनील आंबेकर, शुभम भापकर, श्रीकांत आंबेकर, नीलेश बडे, पप्पू म्हस्के, रवी जाधव, सागर बनसोड आदि उपस्थित होते.

यावेळी बुर्‍हाणनगर रोडवरील बेल्हेश्‍वर मंदिर, शहरातील सिद्धीबागेतील सिद्धेश्‍वर मंदिर, माळीवाडा येथील श्री कपिलेश्‍वर मंदिर, ओंकारेश्‍वर मंदिर, बुर्‍हाणनगर रोडवरील बाणेश्‍वर मंदिर, अर्बन बँक चौकातील अमृतेश्‍वर मंदिर, स्टेट बँक चौकातील विजय शंकर मंदिर, भिंगार येथील शुक्लेश्‍वर मंदिर, फुलसौदर मळा येथील पंचायतन मंदिरासह विविध शिवमंदिरात भाविकांनी गर्दी केली होती.

Leave a comment

0.0/5