Skip to content Skip to footer

वंचित बहुजन आघाडी तर्फे राष्ट्रवादी-काँग्रेसकडे २२ जागची मागणी……

वंचित बहुजन आघाडीने राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाकडे महाआघाडीच्या २२ जागा मागितल्याचे समोर आलेले आहे. त्या जागेत माढा आणि बारामती जागेचा सुद्धा समावेश असल्यामुळे येणाऱ्या लोकसभेला राष्ट्रवादी-काँग्रेस काय निर्णय घेते या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. काही दिवसापूर्वी काँग्रेस विरोधी पक्ष नेते विखे पाटील यांनी पत्र पाठवुन प्रकाश आंबेडकर यांना मतांचे विभाजन टाळण्यासाठी महाआघाडीत येण्याची विनंती केली होती. त्यावर वंचित बहुजन आघाडीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती.
आता प्रकाश आंबेडकर यांनी महाआघाडीकडे २२ जागेची मागणी केली आहे. त्यातील बारामती आणि माढा ही जागा सुद्धा मागितलेली आहे. परंतु ह्या दोन्ही जागेवर सध्या राष्ट्रवादीचे आणि काँग्रेस पक्षाचे विघमान खासदार विराजमान आहेत. त्यामुळे काँग्रेसचे अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे शरद पवार अडचणीत सापडलेले आहेत. आचारसंहितेपूर्वी तोडगा निघाला नाही तर तर उर्वरित 26 जागांवरील उमेदवारही घोषित करणार’, असल्याचं अल्टिमेटम वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दिला आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी कुठेतरी प्रकाश आंबेडकर यांच्या मागे उभा असणाऱ्या बहुजन मतांवरच डोळा ठेऊन त्यांना आघाडीत घेण्याचा निर्णय करत आहे. परंतु वंचित आघाडीचा एक भाग असलेले खा. ओवेसी यांना पक्षात घेण्यासाठी तयार नसल्यचे सुद्धा काँग्रेसने बोलून दाखविले होते त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादी आपल्या २२ जागा वंचित आघाडीला देतात की प्रकाश आंबेडकर यांना आघाडीत घेण्यासाठी दुसरा प्रस्ताव देतात हे येणाऱ्या दिवसात दिसून येईल.

Leave a comment

0.0/5