Skip to content Skip to footer

भित्र्या पाकिस्तानकडून विमानतळं अजूनही बंद

पाकिस्तानने 27 फेब्रुवारीनंतर सियालकोट, बहावलपूरसह सात विमानतळं 10 दिवसांसाठी बंदी ठेवली होती. एअरस्पेस बंद ठेवल्याने पाकिस्तानला लाखों डॉलर्सचे नुकसान सहन करावे लागत आहेत. अनेक विमानसेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तर अजूनही अनेक विमानांचे मार्ग वळवण्यात आले आहेत.

पुलवामा हल्ल्यानंतर हिंदुस्थानने 26 फेब्रुवारी रोजी बालाकोट येथील दहशतवादी तळावर हवाई हल्ले केले. या हवाई हल्ल्यांमुळे पाकिस्तानाचे धाबे दणाणले आहे. हिंदुस्थान-पाकिस्तानातील संबंधातील तणाव लक्षात घेऊन पाकिस्तानने 27 फेब्रुवारी रोजी सियालकोट, बहावलपूरसह आपली 7 विमानतळं 10 दिवसांसाठी बंद केली. मोठे नुकसान सोसावे लागल्याने पाकिस्तानने विमानतळं सुरू केली. पण आता परत एकदा बहावलपूर, रहीम यार खान आणि सियालकोट विमानतळ हे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहे. पाकिस्तान सिव्हिल एविएशन अथॉरिटी (CAA) याची घोषणा केली. संरक्षण विभागाकडून परवानगी मिळाल्यानंतरच पूर्वेकडील विमानतळं वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार असल्याचे वृत्त पाकिस्तानची वेबसाईट डॉनने CAA च्या हवाल्याने दिले आहे.

Leave a comment

0.0/5