Skip to content Skip to footer

चाईल्ड पॉर्नोग्राफी बघणाऱ्या पायलटला अटक

चाईल्ड पॉर्नोग्राफी बघणाऱ्या एका पायलटला (50) सोमवारी अमेरिकेत अटक करण्यात आली. हा पायलट हिंदुस्थानी असल्याने नंतर त्याला हिंदुस्थानी अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मुंबईत राहणाऱ्या या पायलटला चाईल्ड पॉर्नोग्राफी बघण्याचे व्यसन आहे. नवी दिल्लीहून प्रवासी विमान घेऊन अमेरिकेत पोहोचल्यानंतर त्याला एफबीआय पोलिसांनी अटक केली. त्याचा पासपोर्ट व व्हिसाही जप्त करण्यात आला आहे.

हिंदुस्थानी विमान कंपनीत कामाला असलेला हा पायलट नवी दिल्लीहून प्रवासी विमान घेऊन अमेरिका व अनेक देशात जायचा. वरिष्ठ अधिकारी पदावर कार्यरत असलेला हा पायलट विमानातच पॉर्न फिल्म बघायचा, चाईल्ड पॉर्नोग्राफी डाऊनलोड करायचा व व्हायरल करायचा. दोन महिन्यांपासून त्याच्यावर एफबीआयचा वॉच होता. अमेरिकेत एका हॉटेलमध्ये उतरला असता त्याने तेथील इंटरनेटचा वापर करत अनेक पॉर्न व्हिडीओ डाऊनलोड केले होते. याबद्दल हॉटेल कर्मचाऱ्यांना कळताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. अमेरिकेच्या कायद्यानुसार कोणत्याही बाहेरील व्यक्तीस चाईल्ड पॉर्नोग्राफी पाहण्यास, डाऊललोड करण्यास आणि शेअर करण्यास बंदी आहे. यामुळेच पायलटला पोलिसांनी अटक केली त्यानंतर त्याला हिंदुस्थानी अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. अधिकारी त्याला दिल्लीस घेऊन गेले आहेत.l

Leave a comment

0.0/5