पराभूत खैरेंची दुष्काळग्रस्तांना मदत,विजयी जलील यांच्याकडून पाण्याची नासाडी

जलील

 

शेवटच्या फेरीपर्यंत लक्षवेधी ठरलेल्या संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंचा निसटता पराभव झाला होता. तर एमआयएमचे इम्तियाज जलील हे खासदार म्हणून विजयी झाले होते. यंदाच्या निवडणुकीत प्रचारादरम्यान इम्तियाज जलील यांनी दुष्काळासारख्या प्रश्नांवरून शिवसेना आणि खैरेंवर टीका केली होती.

सध्या संपूर्ण मराठवाडा दुष्काळात होरपळून निघत आहे. संभाजीनगरात सुद्धा भीषण पाणीटंचाई आहे. पुरेसा पाऊस न झाल्याने कृत्रिम पाऊस पाडण्याची चाचणीही संभाजीनगरमध्ये घेण्यात आली. आणखी काही दिवस पाऊस न पडल्यास संभाजीनगरात पाण्यासाठी हाहाकार उडू शकतो. अशा परिस्थितीत संभाजीनगरच्या जनतेसाठी शिवसेनेने शक्य तेवढी मदत पुरवली आहे. शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे पराभूत होऊनही दुष्काळग्रस्तांना मदत करताना दिसतात. याउलट खासदार इम्तियाज यांच्या विजयी रॅलीत मात्र हजारो लिटर पाण्याची नासाडी करण्यात आली आहे.

काल एमआयएम खासदार जलील यांनी विजयी रॅली काढून शक्तिप्रदर्शन केलं. संभाजीनगरात भीषण दुष्काळ असताना या रॅलीत त्यांच्या कार्यकर्त्यांनी हजारो लिटर पाणी अक्षरशः वाया घालवलं. हे दृश्य पाहून संभाजीनगरकरांनी नाराजी व्यक्त केली. इम्तियाज जलील खासदार म्हणून विजयी झालेले असल्याने त्यांनी दुष्काळ प्रश्नावर काम करणं अपेक्षित असताना त्यांनीच हजारो लिटर पाणी वाया घालवलं आहे.

याउलट चंद्रकांत खैरे आणि शिवसेनेने मात्र दुष्काळग्रस्तांना सर्वतोपरी मदत केली आहे. दुष्काळग्रस्तांना पाण्याच्या टाक्या, टँकर, धान्य, जनावरांना चारा, शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्यासाठी पीक विमा मदत केंद्रे असे वेगवेगळे उपक्रम शिवसेनेच्यावतीने संभाजीनगर आणि मराठवाड्यात राबवण्यात आले आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून विजयी झालेले जलील मात्र आपली लोकसभेची भाषणं विसरून विजयाचा उन्माद साजरा करत आहेत.

इम्तियाज जलील यांचा उन्माद:दुष्काळग्रस्त संभाजीनगरात केला पाण्याचा अपव्यय

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here