Skip to content Skip to footer

सुजय विखे-गिरीश महाजन यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधान

मुंबई | विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय यांनी राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली आहे. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलं आहे.

सुजय यांना दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस ही जागा काँग्रेसला देण्यास तयार नाही.

विरोधी पक्षनेत्याच्या मुलानेच निवडणूक लढण्यासाठी इच्छा व्यक्त केल्याने काँग्रेसचीही मोठी गोची झाल्याचं पाहिला मिळतंय. मात्र, दुसरीकडे राष्ट्रवादीही जागा सोडण्यास तयार नाही.

दरम्यान, सुजय भाजपमध्ये जाणार अशा चर्चा रंगत होत्या. आता सुजय-महाजन यांच्या भेटीने चर्चा अधिक गडद होणार आहेत.

Leave a comment

0.0/5