Skip to content Skip to footer

तृतीयपंती मतदारांची दुप्पटीने वाढ

टीम महाराष्ट्र देशा : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून रविवारी निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. देशभरात सात टप्प्यात निवडणूका होणार आहेत. तर महाराष्ट्रात चार टप्प्यात निवडणूका घेतल्या जाणार आहेत. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाने यावेळी मतदारांची आकडेवारीही जाहीर केली. या आकडेवारीनुसार महाराष्ट्रामध्ये महिला व पुरूष मतदारांसह तृतीयपंथी मतदारांमध्ये देखील चांगलीच वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

महाराष्ट्रात २०१४ मध्ये तृतीयपंथी मतदारांची संख्या सुमारे ९१८ इतकी होती, तर आता २०१९ मध्ये ही संख्या २०८६ इतकी झाली आहे. या आकडेवारीनुसार तृतीयपंथी मतदारांच्या संख्येत तब्बल दुपटीने वाढ झाल्याचे दिसून आल आहे. तर पुरूष मतदारांची संख्या २०१४ मध्ये ४ कोटी २७ लाख ७० हजार ९९१ होती, ती २०१९ मध्ये ४ कोटी ५७लाख २ हजार ५७९ इतकी झाली आहे. तसेच महिला मतदारांची संख्या २०१४ मध्ये ३ कोटी ८० लाख २६ हजार ९१४ होती, ती आता ४ कोटी १६ लाख २५ हजार ८१९ पोहोचली आहे.

Leave a comment

0.0/5