Skip to content Skip to footer

कुकडीच्या पाण्याचा प्रश्न भाजप सरकार आणि विखेंमुळेच कायमचा सुटेल.

गेल्या काही दिवसात कुकडीच्या पाण्याने वेगवेगळा राजकीय रंग धरला आहे. अनेक वेळा जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे साहेब यांच्यावर टीका होताना दिसत आहे अन त्याचा परिणाम विखे पाटील यांना निवडणुकीत बसेल अशी चर्चा मुद्दाम घडवून आणली जात आहे .मुळातच कुकडीचे पाणी, मनमानी पुणेकर आणि विखे यांना जागा न सोडण्याचे हेही एक कारण मानले जाऊ शकते. अनेक वेळा राष्ट्रवादी पक्षाकडून विखे ऐकणारे नाही असे बोलले जाते, हो हे आहेच कारण विखे साहेब शेतकऱ्यांसाठी चांगले व्हावे यासाठी वरिष्ठांचे काही वेळेस ऐकून घेणार नाहीत हे उघडच होते . पुणेकर नेहमीच अहमदनगरच्या पाण्यावर डल्ला मारणारे ठरले आहेत.

राष्ट्रवादी पक्षाचे निरीक्षक हेही त्याच धरण भागातून येतात त्यामुळे ते राष्ट्रवादीमध्ये राहून ही स्वतःच्या लोकसभा मतदार संघातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत-जामखेड साठी या निरीक्षक साहेबांचे ही कधी ऐकले नसते म्हणून त्यांनीही सुजय विखे पाटील यांना कधी तिकीट देण्याची हिंमत केली नाही आणि भविष्यात त्यांचे ऐकेल आणि ऐकणारे वयाने लहान खासदार, आमदार , नेतेच या भागातून घडावे यासाठी लगाम ठेवला आहे. सुजय विखे पाटील हे राजकीय दृष्टीने भरपूर स्वायत्त आहेत त्यांना कशाची बाहेरच्या ताकतीने हलवून जाईल याची भीती नाही म्हणूनच आघाडीने त्यांच्यावर अन्याय केला आणि हाच कुकडीच्या पाण्यासाठी पुणेरी ज्येष्ठ ताकतीसोबत लढण्यासाठी योग्य पर्याय असल्याचे नेत्यांना व जनतेला जाणवते. कारण उद्याच्या काळात सुजय विखे पाटील हे खासदार होणारच आहेत आणि पुण्याच्या पाणी अडवणाऱ्या व पळवून नेणाऱ्या ताकदीविरुद्ध लढून १००% कुकडीच्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम करणार आहे .

आज भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्याविरुद्ध पाणी प्रश्नांवर झोड उठवली जात आहे. कुकडी प्रश्न हा अनेक काळ जलसंपदा खाते हातात ठेवत काही ठराविक पुणे जिल्ह्यातील नेत्यांनी नगर जिल्ह्याचे राजकारण ताब्यात ठेवण्यासाठी तसाच ठेवला. आमदार विजयराव औटी, माजी मंत्री बबनराव पाचपुते व पालकमंत्री राम शिंदे यांनी कुकडीचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी कुकडी सुधार प्रकल्पसाठी सुमारे ३८०० कोटींची भरीव तरतूद केली जी आतापर्यंत सर्वात मोठी रक्कम आहे तसेच डिंभे ते माणिकडोह चे पाणी जलद यावे म्हणून बोगदा मंजूर केला आणि कुकडीचा पाणी प्रश्न शाश्वत पद्धत्तीने सुटावा म्हणून पश्चिम घाटाकडे जाणारे पाणी कॅनॉलच्या माध्यमातून कुकडीकडे जास्तीत जास्त येण्यासाठी मंजुरी घेतली. कुकडी खालील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न शाश्वतपणे एका अावर्तनासाठी नाही तर अनेक पिढ्यासाठी कसा सुटावा यासाठी आज प्रयत्न करत आहे. आज पुणेकर पाणी शेतीसाठी कमी उद्योग धंदा उभारणी साठी जास्त वापरत आहे आणि भविष्याचे व्हिजन म्हणून नगर जिल्हयातील शेतकऱ्यांना पाण्याविना अपंग बनवून बागायत शेती जाळून शेतकऱ्यांनी ट, शेतमजुरांनी आणि शेतकऱ्यांच्या पोरांनी त्यांना पुणे जिल्ह्यात ह्यांच्याकडे उद्योगधंद्यात मजुरी करावी अशीच त्यांची इच्छा आहे .कालपर्यंत पालकमंत्री बबनराव पाचपुते असताना ते पुणेकरांच्या दावणीला बांधले गेले असे म्हणणारे आज मात्र स्वतः त्या गोठ्यात बसून काही जमेना म्हणून पालकमंत्री व भाजप सरकारला दोष देत आहेत .

होय ही परिस्थिती बदलणार पुणेकरांना पाणी प्रश्नावर मात देण्यासाठी सुजय विखे पाटील हाच पर्याय असणार आणि भविष्यात तो दिसणार अन चालणार पण हेही खासदार म्हणून उद्याच्या काळात आपल्या भाग्यात आहेच .

Leave a comment

0.0/5