Skip to content Skip to footer

मनसे बरोबर गेलेले लोक हे मनाने हिंदुत्ववादी आहेत- देवेंद्र फडणवीस

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार न देता मोदी – शहा यांच्या विरोधात प्रचार करणार असल्याचं घोषित केले आहे. शनिवारी मुंबईमध्ये विराट मेळावा घेत त्यांनी नरेंद्र मोदींवर घणाघात देखील केला, मात्र राज ठाकरेंनी कितीही सभा घेतल्या, तरी त्यांचा फायदा हा भाजप – शिवसेनेलाच होईल, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात ते बोलत होते. मनसे पक्षाच्या स्थापने नंतर शिवसेना पक्षातूनच कार्यकर्ते हे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत दाखल झाले होते. या कार्यर्त्यांनी शिवसेना नंतर फक्त मसने पक्षालाच मतदान केले आहे आणि आता ते राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला कसे काय मतदान करतील कारण गेलेले कार्यकर्ते हे मनाने हिंदुत्ववादी आहेत असे सुद्धा फडणवीस यांनी बोलून दाखविले.

राज ठाकरे यांनी कितीही सभा घेतल्या, तरी त्यांच्या सोबत असणारा दोन चार टक्के मतदार देखील मागे राहणार नाही. त्याच्यासोबत गेलेले लोक हे मनाने हिंदुत्ववादी आहेत, ते जेवढ भाजप – सेने विरोधात बोलतील तेवढा त्यांचा मतदार आमच्याकडे येईल, राज ठाकरेंच्या सभा म्हणजे मान न मान मै तेरा मेहमान असल्याचं, फडणवीस यांनी म्हटले आहे. राज ठाकरे हे अशाप्रकारे वागण्याने आपला टीआरपी कमी करत आहेत, ते जेवढी मोदी विरोधी भूमिका घेतील, तेवढ त्यांच्या पक्षात सगळे मोदी समर्थक आम्हाला मतदान करतील, या निवडणुकीनंतर कदाचित कॉंग्रेस – राष्ट्रवादीने मला फसवल असं राज ठाकरे म्हणतील, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.

Leave a comment

0.0/5