Skip to content Skip to footer

शरद पवार काश्मीर तोडणाऱ्या बरोबर तुम्ही कसे तुमच्या पक्षाचे नाव तर राष्ट्रवादी-नरेंद्र मोदी

“ज्या काश्मीरसाठी देशातील हजारो जवानांनी बलिदान दिले ते काश्मीर सोडायचे का? असे बोलत तुम्ही देखील विदेशी चष्म्यातून बघायला लागला आहे असे वाटते” अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर केली आहे. देशाच्या नावावर काँग्रेस पक्ष सोडणार्या पवारांना आता काय झाले काही समजत नाही. देशात दोन पंतप्रधान आणण्याची भाषा करणारे काँग्रेस काश्मीर तोडण्याची भाषा करत आहे. आता शरद पवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत राहून सुद्धा तुम्हाला झोप कशी लागते. अश्या शब्दात नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्यावर टीका केलेली आहे.

नगर मध्ये महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील आणि खासदार सदशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नगर मध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली होती. यावर मोदी यांनी काँग्रेस पक्षावर सुद्धा निशाणा साधला काँग्रेस पक्ष काश्मीर वेगळे करण्याची भाषा करत आहे. परंतु शरद पवारांना काय झाले आहे. तुम्ही ह्याच मुद्दयांवर काँग्रेस पक्ष सोडला होता. आज दोन पंतप्रधान होणार असतील तरी तुम्ही गप्प का? असा सावल थेट पंतप्रधानांनी शरद पवारांना विचारला आहे. तसेच नगर मधील सभेला मोदी यांनी भाषणाची सुरवात मराठीतून केली होती.

नरेंद्र मोदी यांनी पुढे “नगर मधील शिर्डीच्या साईबाबाच्या सानिध्यात आलेल्या सर्वांना माझे नमन, तसेच महाराष्ट्रातील आणि नगर मधील जनतेला राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा” दिल्या होत्या. यावेळी मोदी म्हणाले ५ वर्ष पूर्वी मी इथं आलो होतो त्या पेक्षा आज दुपटीने जास्त लोक इथे जमलेले आहे. तुमच्या या प्रेमाला आणि विश्वासाला मी नमन करतो. तुम्ही एवढया उन्हात इथं येत माझ्यावर कर्ज वाढवले असे सुद्धा उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले होते.

Leave a comment

0.0/5