Skip to content Skip to footer

धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल करा निवडणूक आयोगाचे पोलिसांना आदेश

आपल्या भाषण शैलीमुळे आणि आपल्या वागण्यामुळे सतत पक्षाला आणि स्वतःला अडचणीत आणणारे राष्ट्रवादीचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी आचारसंहिता भंग केल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने पोलिसांना दिलेले आहे. धनंजय मुंडे यांनी सरकारी बंगल्यावर आपल्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करून स्वतःला आणि पक्षाला अडचणीत आणले आहे. तसेच तपासात सुद्धा सिद्ध झालेले आहे. त्याबाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले गेलेले आहे. पोलीस आता याबाबत कारवाई करतील, अशी माहिती मुंबई शहराचे जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, धनंजय मुंडे यांनी आपल्या बी ४ या सरकारी बंगल्यात पत्रकार परिषद आयोजित केली होती. तसेच विविध पत्रकार समुहाला सुद्धा आमंत्रण देण्यात आलेले होते आचारसंहिता लागू असताना सरकारी मालमत्तेचा वापर करता येत नाही. त्यामुळेच आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी राष्ट्रवादी विरोधात तक्रार करण्यात आली होती. तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने यासंबंधी चौकशीचे आदेश दिले होते. तपासाअंती सरकारी बंगल्याचा गैरवापर केल्याचे सिद्ध झालेले आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या विरोधात निवडणूक आयोगाने पोलिसांना कारवाही करण्याचे आदेश दिले आहे. यावर राष्ट्रवादीच्या नेत्या कडून काहीही उत्तर आलेले नाही आहे.

Leave a comment

0.0/5