Skip to content Skip to footer

बारामतीचा गड राखण्यासाठी अजित पवार घेणार ६ सभा

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील बारामती मतदार संघ जिंकण्यासाठी माजी मंत्री अजित पवार यांनी कंबर कसली आहे तसेच त्यांच्या ६ सभांचे आयोजन सुद्धा या मतदार संघात करण्यात आल्या आहेत. बारामती मतदार संघातून खासदार सुप्रिया सुळे यांना भाजपा पक्षाचे उमेदवार कांचन कुल यांनी तगडे आव्हान असणार आहे. त्यातच भाजपा पक्षाचे डिग्गज नेते मंडळींनी सुद्धा बारामती मतदार संघात सभा घेण्याचा धडाकाच लावला आहे. त्यामुळे बारामतीचा गड आपल्या हातून निसटणार का? असा प्रश्न सध्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना पडलेला दिसून येत आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामती तालुक्यावर मजबूत पकड आहे. ते स्वत: विधानसभेला याच मतदारसंघातून निवडून जात असतात. त्यामुळे लोकसभेला या तालुक्यातून सुप्रिया सुळेंना मोठं मताधिक्य देण्यासाठी अजित पवार मैदानात उतरले आहेत. आज बारामती तालुक्यात अजित पवार तब्बल सहा सभा घेणार आहेत. विद्यमान खासदार आणि उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ अजित पवार हे निरावागज सांगवी, माळेगाव ,वडगाव निंबाळकर, करंजेपूल, सुपा या ठिकाणी सभा घेऊन आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील असे सांगण्यात येत आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपने रासपमधून निवडून आलेले आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन राहुल कुल यांना उमेदवारी दिली आहे. कांचन कुल यांच्या उमेदवारामुळे बारामतीमध्ये दोन महिला उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे. रासप आमदार राहुल कुल यांचे इंदापूरमधील काँग्रेस नेते हर्षधवर्धन पाटील आणि भोरचे काँग्रेस आमदार संग्राम थोपटे या नेत्यांशी चांगले संबंध असल्याचं बोललं जातं. त्यामुळे त्यांना या मतदारसंघात फायदा होऊ शकतो. शिवाय राहुल कुल हे स्वत: दौंड विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या पुढे तगडे आव्हान भाजपाने निर्माण करून ठेवले आहे.

Leave a comment

0.0/5