Skip to content Skip to footer

मी प्रीतम मुंडेंच्या पाठिशी खंबीरपणे उभा -छत्रपती संभाजीराजे

स्व. गोपीनाथ मुंडे यांनी माझ्या मुलींकडे लक्ष द्या असे सांगितले होते. त्यामुळे मुंडेंवरील प्रेमापोटी मी आज प्रीतम मुंडे यांच्या भेटीसाठी आलो आहे. मी त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे असे ही छत्रपती संभाजीराजे यांनी बोलून दाखविले आहे. बीड लोकसभा निवडणुकीत परळी येथे कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी खासदार प्रीतम मुंडे यांची भेट घेऊन त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. तसे आपण भाजपाचे सहयोगी खासदार आहोत त्यामुळे नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला होता. छत्रपती संभाजीराजे यांच्या भेटीमुळे राजेंना मानणारा संपूर्ण मराठा समाज मुंडे यांच्या मागे उभा राहील असेच बोलले जात आहे.

‘गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाआधी त्यांच्याशी भेट झाली होती तेव्हा त्यांनी एकदा बोलताना माझ्या मुलींकडे लक्ष ठेवा असे म्हटले होते. त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांच्या कन्यांच्या पाठीमागे मी भावाप्रमाणे खंबीरपणे उभा आहे. असे देखील त्यांनी बोलून दाखविले होते. काहीच दिवसापूर्वी विनायक मेटे यांनी मुंडे यांच्यावर रुसलेले होते. त्यामुळे आपण भाजपा सॊबत आहोत पण प्रीतम मुंडे यांचा प्रचार करणार नाही असे स्पष्ठ संकेत त्यांनी भाजपाला दिले होते. त्यामुळे मेटे यांची समजूत काढण्यासाठी भाजपाला तारेवरची कसरत कारावी लागणार आहे. परंतु छत्रपती संभाजीराजे यांच्या पाठींब्या नंतर मुंडे यांच्यासाठी पोषक असेच वातावरण बीड जिल्ह्यात निर्माण झालेले दिसून येत आहे.

Leave a comment

0.0/5