Skip to content Skip to footer

ममता दीदी सद्दाम हुसैन सारख्या का वागत आहे – विवेक ओबरॉय

पश्चिम बंगालमधील कोलकात्यात भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या रोड शो दरम्यान हिंसाचार, जाळपोळ झाली. भाजप कार्यकर्ते आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. यामुळे पश्चिम बंगाल ते दिल्लीपर्यंतचं राजकीय वातावरण तापलेले दिसून येत आहे. आता बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय याने देखील या वादात उडी घेतली आहे. भाजपाचे समर्थन करत विवेकने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. विवेक ओबेरॉयने ममता बॅनर्जी यांना इराकचा हुकूमशहा सद्दाम हुसेन यांची उपमा दिली आहे.

ममता बॅनर्जी यांच्या ‘लोकतंत्र खतरे में है’ या विधानाच्या बातमीचा एक फोटो विवेकने ट्वीट केला. त्यासोबत विवेकने लिहिले, मला कळत नाही आहे की, दीदींसारख्या आदरणीय महिला सद्दाम हुसेनसारख्या का वागत आहेत. दुर्दैव बघा लोकशाहीला धोका आहे आणि तो स्वत: हुकूमशाह दीदींपासून आहे. आधी प्रियांका शर्मा आणि आता तजिंदर बग्गा. ही दीदीगिरी चालणार नाही. अशा शब्दात पश्चिम बंगाल मध्ये झालेल्या हिंसाचाराचे असमर्थन विवेक ओबरॉय यांनी केले आहे. विवेक ओबरॉय यांनी नरेंद्र मोदी यांच्या बायोपिक मध्ये मोदी यांची भूमिका साकारलेली होती. परंतु आचारसंहितेच्या कारणास्तव मोदी यांच्यावरील चित्रपट प्रदर्शित झाला नव्हता.

Leave a comment

0.0/5