Skip to content Skip to footer

सात तरुणांच्या अपघाती मृत्यूनंतर दौलताबाद, शरणापूर परिसर सुन्न

दौलताबाद (औरंगाबाद ) : दौलताबाद व शरणापूर परिसरातील सात तरुण बेळगावजवळीलअपघातात ठार झाल्याने संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला आहे.  मृतातील 5 तरुण शरणापूरचे असून दोन तरुण दौलताबादचे आहेत.

सर्वांचे मृतदेह आज मध्यरात्री किंवा उद्या पहाटेपर्यंत येथे गावात दाखल होतील. मृतांचे नातेवाईक आक्रोश करत असून ग्रामस्थ त्यांना धीर देताना दिसत आहेत. दोन्ही गावात चुली पेटल्या नसून गावातील महिला मृतांच्या घरी जाऊन सांत्वन करीत आहेत. अतिशय हृदयद्रावक दृश्य गावात दिसत असून गावकऱ्यांचा कंठ दाटून येत आहे.

औरंगाबाद नजीकच्या छोट्याशा गावातील हे उमदे तरुण अचानक गेल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सध्या बेळगावमध्ये त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन सुरू. मृतदेह आणण्यासाठी तरुणांचे  नातेवाईक रविवारीच बेळगाव येथे दाखल झाले असून मृतदेह मिळताच ते गावाकडे परतील. दरम्यान, या भागातून ५० पेक्षा जास्त ग्रामस्थ बेलगावकडे रवाना झाले असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.

Leave a comment

0.0/5