Skip to content Skip to footer

शिवसेनेने करून दाखवलं ! बेस्ट झाली आणखी बेस्ट..

शिवसेनेने करून दाखवलं ! बेस्ट झाली आणखी बेस्ट..

मुंबईकरांच्या दळणवळणाचे महत्वाचे साधन असलेल्या “बेस्ट”ची दरकपात अखेर काल जाहीर झाली. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत ही ऐतिहासिक दरकपात जाहीर झाली.यात बेस्टचे दर १५ स्लॅब ऐवजी ४ स्लॅबमध्ये राबवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. “बेस्ट” बसचे किमान भाडे ८ रुपयांवरून ५ रुपयांवर आले आहे. त्यामुळे “बेस्ट”च्या ५ किमी प्रवासासाठी आता केवळ ५ रुपये मोजावे लागतील. एसी प्रवासासाठी हा दर ६ रुपये इतका असेल.

लाखो मुंबईकरांच्या जीवनातील अविभाज्य घटक असलेल्या “बेस्ट”ची दरकपात करून शिवसेनेने मास्टरस्ट्रोक मारला आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना अत्यल्प दरात प्रवास करणं शक्य होणार आहे. “महापालिकेने घेतलेल्या या निर्णयाबद्दल पालिकेचे अभिनंदन करण्यासाठी मी महापालिकेत आलो आहे” अशी प्रतिक्रिया यावेळी आदित्य ठाकरेंनी दिली. “बेस्ट”चा कायापालट करणारा हा निर्णय असून आगामी काळात बेस्ट बसेसची संख्या ३००० वरून दुपटीने वाढवून ६००० इतकी करण्यात येणार आहे. तसेच एसी बसेसची संख्या वाढवण्यात येणार असून ५०० इलेक्ट्रिक बसेस सुद्धा बेस्ट च्या ताफ्यात दाखल करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं आदित्य ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं. मुंबईतील छोटे मार्ग निवडून त्यावर “मिनी बस” सुरु करणार असल्याचंही ते म्हणाले.

बेस्टचे भाडे किमान ५ रुपये करण्याच्या प्रस्तावाला अखेर मंजुरी.

आगामी काळात बेस्ट, मेट्रो आणि रेल्वे यांच्या तिकिटांची सांगड घालून यासाठी एकच तिकीट आणि मुंबई दर्शन फेरीसाठी केवळ २० रुपये तिकीट अशा योजना राबवण्याचा मानस आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला. बेस्टच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे नागरिकांना केवळ ५ रुपयात सुरक्षित, सुखकर प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे आपसूकच बेस्टच्या प्रवासी संख्येत वाढ होणार आहे.

Leave a comment

0.0/5