Skip to content Skip to footer

नितीश कुमार यांनी माझ्या वडिलांचा अपमान केला ! – चिराग पासवान

 

लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच, नितीश कुमार यांनी रामविलास पासवान यांचा अपमान केला होता, असा आरोप देखील त्यांनी केला आहे. चिराग पासवान यांनी यावेळी स्पष्ट केले की, केवळ जागा वाटपाच्या मुद्यावरूनच जेडेयूशी त्यांनी फारकत घेतलेली नाही. चिराग यांचे म्हणणे आहे की, त्यांचा पक्ष जेडेयूच्या राजकारणाचा विरोध करत आलेला आहे.

चिराग पासवान म्हणाले, मागील वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांची जेडेयू बरोबर आघाडी होती. कारण, जेडेयू एनडीए आघाडीत परतली होती. तर, चिराग यांनी हा देखील आरोप केला आहे की, लोकसभा निवडणुकीत जेडेयूने लोक जनशक्ती पार्टीच्या उमेदवारांच्या विरोधात काम केले. जे की आघाडीच्या धर्माचे उल्लंघन होते. चिराग पासवान यांनी अधिक विस्तृतपणे बोलताना सांगितले की, मागील वर्षी त्यांच्या वडिलांनी राज्यसभेचे नामांकन दाखल करते वेळी नितीश कुमार यांना सोबत यावं असं म्हटलं होतं. मात्र, नितीश कुमार हे अहंकाराने वागले व ठरलेल्या वेळेच्या नंतर आले. कोणताही मुलगा ही गोष्ट विसरणार नाही.

त्यानंतर चिराग पासवान म्हणाले की, अशातच नितीश कुमार यांनी म्हटले होते की जेडेयूच्या पाठिंब्याशिवाय रामविलास पासवान राज्यसभेत जाऊ शकत नव्हते, कारण आमचे केवळ दोन आमदार होते. त्यांनी हे लक्षात घ्यायला हवं होतं की, माझ्या वडिलांना राज्यसभेची जागा देण्याचे आश्वासन तत्कालीन भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी स्वतः दिले होते.

Leave a comment

0.0/5