Skip to content Skip to footer

कंगनाने मुंबईत पाय ठेवताच कंगना होम क्वारंटाईन होईल – किशोरी पेडणेकर

सिनेअभिनेत्री कंगना रानवातला मुंबईत येताच मनपाच्या नियमानुसार होम क्वारंटाईन करण्यात येईल अशी माहिती महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी दिली आहे. काही दिवसापूर्वी कंगनाने मी मुंबई येत्या ९ सप्टेंबर रोजी येत असून ज्यांना अडवायचे आहे त्यांनी अडवून दाखवा असा इशारा तिने विरोध करणाऱ्यांना दिला होता त्यात केंद्र सरकारने तिला “वाय” दर्जाची सुरक्षा देऊन राज्य सरकारला आणखीनच डिवचण्याचा प्रयत्न केला.

येत्या बुधवारी कंगना रनौत ही हिमाचल प्रदेशातून मुंबईत येणार आहे. त्यामुळे परराज्यातून आलेल्या व्यक्तीला नियमानुसार होम क्वारंटाईन केले जाते. त्यामुळे नियमानुसार कंगनाच्या हातावरही विमानतळावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारला जाणार आहे. आयसीएमआरच्या गाईडलाइन तत्वानुसार, परराज्याततून आलेल्या व्यक्तीला होम क्वारंटाईन करण्याचे नियम आहेत. मी प्रशासनाकडून माहिती घेतली. आज किंवा उद्यामध्ये काही नवे नियम जाहीर होण्याची शक्यता आहे. असे यावेळी महापौर किशोरी पेडणेकर यांनी बोलून दाखविले होते.

Leave a comment

0.0/5