Skip to content Skip to footer

“मोदी सरकारचे सध्या ‘हम दो हमारे दो’ असेच चालू आहे.” – नाना पाटोले.

नवनिर्वाचित काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार मुंबई टिळक भवन येथे स्वीकारला. या कार्यक्रमाला काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांनी तसेच मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात पाटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली होती.

“अर्थसंकल्पात देशातील संपत्ती विकून १ लाख ९५ हजार कोटी रुपये उभारणार असल्याचे मोदी सरकारने सांगितले आहे. यासाठी त्यांनी मुंबईची आणि देशाची शान असलेलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशनही विकायला काढलं. मोदी सरकारला जनतेने देश विकायला सत्तेवर आणले नव्हते.” असा टोला पटोले यांनी लगावला होता.

पुढे आरोग्य विषयावरून बोलताना पटोले म्हणाले की, “देशात दवाखाने नाहीत, तरी नवी संसद उभारली जात आहे. संसद चांगली असतानाही दुसरी इमारत उभारली जातेय. यांचे कामकाज सुरू झाले तेव्हापासून ‘हम दो, हमारे दो’ असे सुरू झाले. अमित शहांची प्रॉपर्टी झपाट्याने वाढली. ठराविक उद्योगपतींची प्रॉपर्टी लॉकडाऊन काळातही वाढली कशी?” असा प्रश्न उपस्थित केला होता.

Leave a comment

0.0/5