Skip to content Skip to footer

संजय राऊत यांची शिवसेना पक्षाच्या मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना खासदार संजय राऊत यांची मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच आणखी १० जणांनी पक्षाच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. या संदर्भातील माहिती शिवसेना मद्यवर्ती कार्यलयातून देण्यात आलेली आहे.

खासदार अरविंद सावंत, खासदार धेर्यशील माने, खासदार प्रियांका चतुर्वेदी, आ.डॉ.नीलम गोऱ्हे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, परिवहन मंत्री अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार सुनील प्रभू, आमदार प्रताप सरनाईक, महापौर किशोरी पेडणेकर यांची पक्ष प्रवक्ते म्हणून नियुक्ती झाल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यलयाने दिली आहे.

Leave a comment

0.0/5