Skip to content Skip to footer

सांगली जिल्ह्यात पंतप्रधान मोदींचा वाढदिवस बेरोजगार दिवस म्हणून साजरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस सर्वत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा देत असताना मात्र महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात युवक कॉँग्रेसकडून ‘बेरोजगार दिन आंदोलन’ करण्यात आले आहेत. सांगलीत गुरुवारी युवक कॉँग्रेसने धरणे आंदोलन करून वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन देणाऱ्या मोदींनी लॉकडाउऊनमध्ये १२ ते १३ कोटी लोकांचा रोजगार घालवल्याचा आरोप या आंदोलनात करण्यात आला आहे.

भाजपच्या वतीने संपूर्ण देशभरात पंतप्रधान मोदी यांचा ७० वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या निमित्ताने सांगली जिल्हा भाजपच्या वतीने सेवा सप्ताहाचे आयोजन केले आहे. युवक कॉँग्रेसने मात्र अनोख्या पद्धतीने पंतप्रधान मोदी यांना वाढदिवसाची भेट दिली. युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष नगरसेवक मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवनसमोर ठिय्या मारून बेरोजगार दिन आंदोलन केले.

यावेळी वाढलेल्या बेरोजगारीवरून केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्मिती करण्याचे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी दिले होते. प्रत्यक्षात मात्र मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढत आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच लॉकडाउनमध्ये देशात १२ ते १३ कोटी लोकांचा रोजगार गेल्याचा आरोपही युवक कॉँग्रेसने केला.

Leave a comment

0.0/5