Skip to content Skip to footer

आता हॉटेल सुरु करण्यासाठी लागणार १० पेक्षा कमी परवानग्या – आदित्य ठाकरे

राज्यातील हॉस्पिटॅलिटी क्षेत्राला चालना देण्यासाठी इज ऑफ डुइंग बिझनेस अंतर्गत लागणाऱ्या विविध परवानग्या कमी करण्याच्या अनुषंगाने पर्यावरण, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या च्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली.

हॉटेल, लॉजेस, रिसॉर्टस्, रेस्टॉरंट्स यामधून फार मोठ्या प्रमाणात रोजगार तयार होत आहे. त्यामुळे कोरोनानंतरच्या काळात या क्षेत्राला चालना देण्यात येईल. नवीन हॉटेल्ससाठी लागणाऱ्या परवान्यांची संख्या १० पेक्षा कमी करणे हे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

या महत्त्वपूर्ण बैठकीला आदित्य ठाकरेंसह पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव अरविंद कुमार, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, तसंच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Leave a comment

0.0/5