Skip to content Skip to footer

भाजपा शासित राज्यात महिला असुरक्षित! – खासदार प्रियांका चतुर्वेदी

भाजपा शासित राज्यात महिला असुरक्षित! – खासदार प्रियांका चतुर्वेदी

उत्तरप्रदेश मध्ये एका दलित अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराविरोधात संपूर्ण देशभरात भाजपा आणि उत्तरप्रदेश मधील योगी सरकार विरोधात संतापाचे वातावरण पसरले आहे. त्यात उत्तरप्रदेश सरकारच्या संशयास्पद वागणुकीमुळे योगी सरकार आरोपींना वाचवाण्याचा प्रयत्न करत असल्याचे आरोप त्यांच्यावर होत आहे. आता यावर शिवसेना राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी भाष्य केले आहे.

यावर बोलताना त्या म्हणाल्या आहेत की, उत्तर प्रदेशातील हाथरस येथील घटना खेदजनक असून, भाजपप्रणीत राज्यांत महिला अत्याचारांबाबत प्रत्येकाने आवाज उठविला पाहिजे. भाजपप्रणीत राज्यांत महिला असुरक्षित असल्याची टीका करत, महिला सशक्त झाल्या तरच देश सशक्त होईल, अशा भावना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी व्यक्त केल्या आहेत.

त्या आज अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये जय हिंद महिला मंचच्या वतीने आयोजित ‘महिलांचे सशक्तीकरण व आरोग्य’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात सहभागी झाल्या होत्या. आपल्या देशात महिलांची लोकसंख्या सुमारे पन्नास टक्के आहे. विविध क्षेत्रांमध्ये महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत. देशाची ताकद असणाऱ्या महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना चिंताजनक आहेत. कोरोनाच्या संकटामुळे देशातील २३ टक्के महिला बेरोजगार झाल्या आहेत, असेही त्यांनी बोलून दाखविले होते.

Leave a comment

0.0/5