खरा हिंदुस्थानी म्हणून बाळासाहेब जहीर खानची जेव्हा पाठ थोपटतात..
बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचं चिवट, कडवट देशप्रेमाचे आजपर्यंत अनेक किस्से सांगितले जातात. पण त्यातला सर्वात गाजलेला आणि बाळासाहेबांचं देशप्रेम ज्यामुळे अजून प्रखरपणे पाहायला मिळाला तो म्हणजे जहीर खान सोबत घडलेला किस्सा.
२००४ सा भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्याने पाकिस्तान मधलं लोकप्रिय दैनिक डॉन मध्ये मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये त्याला बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या भूमिकेबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्याने दिलेलं उत्तर संपूर्ण देशाचे आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्राचं नाव गौरवणारं होते.
जहीर खानला ” तू भारतात राहतोस त्यातही तू महाराष्ट्रात राहतोस. तिथे बाळासाहेब ठाकरे यांचं आणि त्यांच्या शिवसेनेचा दबदबा आहे. तर तिथे तुला एक मुस्लिम म्हणून काही त्रास होतो का?” असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर जहीर खान म्हणाला होता की, ” बाळासाहेब ठाकरे हे मुस्लिम विरोधी नाही तर राष्ट्रप्रेम नसलेल्या आणि देशात विध्वंस करू पाहणाऱ्यांच्या विरोधात आहे. काही लोकांनी त्यांची इमेज तशी बनवली आहे. आज पर्यंत बाळासाहेबांनी किंवा शिवसेनेने देशप्रेमी मुसलमानांना कधीही त्रास दिलेला नाही.”
त्याचं हे उत्तर प्रसिद्ध होताच आणि ही मुलाखत समोर येताच बाळासाहेबांनी याबद्दल माहिती घेतली. त्यावर त्यांनी ‘जहीर खान हा खरा हिंदुस्थानी मुसलमान आहे’, असे म्हटले होते.
त्यामुळे बाळासाहेब ठाकरे हे मुस्लिम नाही तर राष्ट्रविरोधी लोकांच्या विरोधात असल्याची भावना असंख्य मुस्लिम बांधवांच्या मनात जागृत झाली.