Skip to content Skip to footer

गिरीश महाजन यांच्यापासून जीवाला धोका, राष्ट्रवादी कार्यकर्ते प्रफुल्ल लोढा यांचे निवेदन.

गिरीश महाजन यांच्यापासून जीवाला धोका, राष्ट्रवादी कार्यकर्ते प्रफुल्ल लोढा यांचे निवेदन.

भाजपचे नेते तथा माजी मंत्री गिरीश महाजन व त्यांचे समर्थक रामेश्वर नाईक यांच्यापासून आपल्या जीवाला धोका आहे. त्यामुळे मला व कुटुंबीयांना सरकारकडून पोलिस संरक्षण द्यावे, असे निवेदन जामनेर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रफुल्ल लोढा यांनी पोलिस प्रशासनाला दिले आहे.
या निवेदनात प्रफुल्ल लोढा म्हणतात की, गिरीश महाजन आणि नाईक यांच्या पासून मला आणि माझ्या संपूर्ण कुटुंबियांना धोका आहे. याबाबत मी १८ जून रोजी पोलिस अधीक्षक तसेच मुख्यमंत्री यांनाही तक्रार अर्ज सादर केला आहे. गेल्या ४ ते ५ महिन्यांपासून मी माझ्या काही हितचिंतकांकडून वर्गणी गोळा करून पोलिस बंदोबस्त घेतला आहे. परंतु, आता मला बंदोबस्तासाठी पैसे भरणे शक्य नाही.
त्यामुळे मला बंदोबस्त देण्यात यावा. रामेश्वर नाईक यांनी ३० व ३१ जुलै रोजी व्हॉट्स अॅपवरून कॉल करून आमच्या नादी लागू नको, आमचे खूप मोठ्या लोकांशी संबंध आहेत. तुला मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश तसेच बिहारमधील गुंडांमार्फत किंवा वाहनाने अपघात करून मारून टाकू, अशी धमकी दिली, असेही प्रफुल्ल लोढा यांनी निवेदनात म्हटले आहे.

Leave a comment

0.0/5