Skip to content Skip to footer

अश्विनी कुमार यांच्या मृत्यूचे रहस्य सीबीआयने शोधावं! – सामना

अश्विनी कुमार यांच्या मृत्यूचे रहस्य सीबीआयने शोधावं! – सामना

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येची ज्याप्रकारे सीबीआय चौकशी करण्यात आली त्याप्रमाणे आता माजी सीबीआय संचालकपदी काम केलेल्या अश्विनीकुमार यांची सुद्धा सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आजच्या सामना अग्रलेखातून करण्यात आलेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर निशाण साधण्यात आलेला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगताना दिसत होती. महाराष्ट्र सरकारवरही या प्रकरणी जोरदार टीका करण्यात आली होती. तर, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले होते. मात्र, एम्सच्या डॉक्टरांनी दिलेल्या अहवालानुसार सुशांतने आत्महत्याचे केल्याचे स्पष्ट होतं आहे. यावरूनच पुन्हा एकदा शिवसेना आक्रमक झाली असून, सुशांतसिंह प्रकरणाप्रमाणेच सीबीआयचे माजी संचालक अश्विनीकुमार यांच्याही मृत्यूचे रहस्य सीबीआयनं शोधावं, अशी मागणी शिवसेनेनं केली आहे.
‘सीबीआयच्या प्रमुख संचालकपदी काम केलेली व्यक्ती नैराश्याने ग्रासते, जगण्यासारखे काही उरले नाही, आयुष्याचाच कंटाळा आलाय म्हणून आत्महत्या करते यावर आपण सगळे डोळे मिटून विश्वास ठेवतो, हे काही पटत नाही’, अशी शंका शिवसेनेनं उपस्थित केली आहे.
‘अश्विनीकुमार यांना खरेच आयुष्याचा कंटाळा आला की त्यांच्यावर कुणाचा दबाव होता, यावर सध्या हिमाचलमध्ये वास्तव्यास असलेल्या नटीनं भाष्य केलं पाहिजे. अश्विनीकुमारांना कोणत्या परिस्थितीत आत्महत्या करावी लागली, हा प्रश्न कर्कश भुंकणाऱ्या वृत्तवाहिन्यांनी विचारायला हवा. सुशांत प्रकरणात आत्महत्या नसून हत्याच आहे, हे सिद्ध करण्यासाठी ज्यांनी जिवाचा अटापिटा केला त्यांना सीबीआयचे माजी संचालक अश्विनीकुमार यांच्या आत्महत्येमागे काहीतरी रहस्य आहे, कारस्थान आहे असं वाटू नये, हे गौडबंगाल आहे,’ असं म्हणत शिवसेनेनं अप्रत्यक्षरित्या कंगनावर निशाणा साधला आहे.

Leave a comment

0.0/5