Skip to content Skip to footer

आमदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते पार पडला स्थलांतरित नूतन ट्रान्सफॉर्मर्सचा लोकार्पण सोहळा

महाराष्ट्र बुलेटिन : खेड शहरातील बंदर नाका (देवणा) येथील महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे ट्रान्सफॉर्मर्स जगबुडी नदीपात्राजवळ असल्याकारणाने गेली कित्येक वर्षांपासून तेथे पुरजन्य परिस्थिती उद्भवल्यास ते पाण्याखाली जात होते. दरम्यान लोकांची गैरसोय थांबावी या उद्देशाने त्वरित आमदार निधीतून योगेशदादा कदम यांनी १० लक्ष रुपये या कामासाठी उपलब्ध करून दिले आहेत व तातडीने काम मार्गी लावण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत.

सदर ठिकाणी पूरजन्य परिस्थिती उद्भवल्यास सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून महावितरण विभागाकडून विद्युत पुरवठा खंडित करण्यात येत होता व त्यामुळे तेथील नागरिकांची मोठ्या प्रमाणात पूर परिस्थितीमध्ये गैरसोय होत होती. यावर तोडगा काढण्यासाठी स्थानिक नागरिकांनी सदर ट्रान्सफॉर्मर्स हे उंच सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावेत अशी मागणी केली होती. नागरिकांची ही मागणी लक्षात घेता तातडीने आमदार योगेश कदम यांनी यात लक्ष घालून त्वरित आमदार निधीतून १० लक्ष रुपये या कामासाठी उपलब्ध करून काम मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या, त्यामुळे या समस्येचा सामना करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान नुकताच या स्थलांतरित नूतन ट्रान्सफॉर्मर्सचा लोकार्पण सोहळा आमदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला आहे. या सोहळ्यादरम्यान स्थानिक नागरिकांनी योगेश कदम यांची भेट घेऊन काम मार्गी लावल्यामुळे त्यांचे विशेष आभार मानले. यावर आमदार साहेबांनी अशीच विविध विकासकामे यापुढेही मार्गी लागतील असे आश्वासन नागरिकांना दिले.

या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाला माजी जि.प. सभापती अण्णा कदम, माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, तालुकाप्रमुख विजय जाधव, शहरप्रमुख निकेतन पाटणे, नगरपरिषद शिवसेना गटनेते प्रज्योत तोडकरी, माजी नगराध्यक्ष नागेश तोडकरी, बिपिन पाटणे, सुनील दरेकर, स्वप्नील सैतवडेकर, जावेद कौचाली, अमोल दळवी, विजय कदम, प्रशांत कदम, अंकुश विचारे, नम्रता वडके, सीमा वंडकर, रूपाली खेडेकर, सुरभी धामणस्कर, मिनार चिखले, राजेश बुटाला, सिद्धेश खेडेकर, दर्शन महाजन, पूनम जाधव, अभिजीत चिखले, आदित्य चिखले, संजना कुडाळकर, मीनाक्षी मोकाशी, श्वेता चिखले, सई चिखले, नूतन सावंत, सुप्रिया कदम, सुप्रिया पवार, कौशल जाडकर, रोहन पाडळकर, कौशल चिखले, कबीर मोकाशी, रोहित यादव, सुकलेंदर काते, बाळा कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a comment

0.0/5