शिवसेनेच्या शिव अल्पसंख्याक सांगली जिल्हा प्रमुख पदी युवानेते भरत कुमार अशोक पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आज शिवसेनेच्या माध्यमातून ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या धेर्य-धोरणानुसार पक्ष संघटना वाढीसाठी आणि पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी भरत कुमार पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
संघटनेचे ध्येय, धोरणे आणि अल्पसंख्याक हिताचे कार्यक्रम वेळो-वेळी निष्ठेने राबवावे असे या पत्रात नमूद करण्यात आले. आज अल्पसंख्याक समाजाला खंबीर नेतृत्वाची गरज असून त्याची विश्वासहर्ता जपणे महत्वाची आहे असे पत्रात नमूद केले आहे. तसेच त्यांच्या पुढच्या राजकीय वाटचालीला शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत.