Skip to content Skip to footer

सत्ता स्वीकारल्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन देणार भारतीयांना भेट

जानेवारी महिन्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचा पदभार स्विकारल्यानंतर जो बायडन लवकरच भारतीयांना भेट देणार आहेत. दस्तावेज नाहीत अशा पाच लाख भारतीयांसह एक कोटी १० लाख स्थलांतरितांना, आता अमेरिकेचे नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांचे प्रशासन यासाठी आराखडा तयार करणार आहे. या निर्णयाचा फायदा भारतीयांसह एक कोटी १० लाख लोकांना होणार आहे. याव्यतिरिक्त वर्षाकाठी सुमारे ९५ हजार शरणार्थींना अमेरिकेत प्रवेश देण्याबाबतही प्रणाली तयार करण्यात येणार आहे.

बायडन यांच्या निवडणूक अभियानाद्वारे जारी करण्यात आलेल्या धोरण अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. ‘ते लवकरच अमेरिकी काँग्रेसमध्ये अनिवासी सुधारणा कायदा मंजूर करण्यावर काम करणार आहे. या अंतर्गत कागदपत्रे नसलेल्या पाच लाखांहून अधिक भारतीयांसह एक कोटी १० लाख स्थलांतरितांना अमेरिकेचे नागरिकत्व देण्यासाठी आराखडा तयार करण्यात येणार आहे,’ असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

या अहवालानुसार बायडन हे दर वर्षी सुमारे सव्वालाख शरणार्थींना अमेरिकेत प्रवेश देण्याचे लक्ष्य ठेवणार असून, कमीत कमी ९५ हजार शरणार्थींना देशात प्रवेश देण्यासाठी काँग्रेससोबत काम करणार आहेत.

Leave a comment

0.0/5