Skip to content Skip to footer

गोस्वामी याला फोन उपलब्ध करून देणाऱ्या ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन?

गोस्वामी याला फोन उपलब्ध करून देणाऱ्या ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन?

अर्णब गोस्वामी यांना कारागृहात मोबाईल फोन उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यामुळे एकच खळबळ माजली होती. या संदर्भात सुरु असलेल्या चौकशीत अलिबाग कारागृहातील आनंद भेरे आणि सचिन वाडे या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

अर्णब गोस्वामी यांना अलिबाग येथील मराठी शाळेत क्वारंटाइन करण्यात आले होते. तेथे तात्पुरत्या स्वरूपातील तुरुंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र रात्री उशिरा अर्णब गोस्वामी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांना आढळून आले. या संदर्भातील तक्रार रायगड पोलिसांकडे करण्यात आली होती.

अर्णबला तळोजा येथील कारागृहात सुरक्षेच्या कारणास्तव हलवले. त्याबाबत इतर आरोपींकडे चौकशी सुरू होती. या तपासामध्ये दोन कारागृह पोलिस कर्मचाऱ्यांनी इतर काही आरोपींना मोबाईल उपलब्ध करून दिल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले आहे. यामुळे येथील कारागृह व्यवस्थापनाबाबत आता संशय व्यक्त होत आहे.

Leave a comment

0.0/5