Skip to content Skip to footer

सर्वसामान्य नागरिकांना पुढच्या वर्षीच लोकलने प्रवास करता येणार

सर्वसामान्य नागरिकांना पुढच्या वर्षीच लोकलने प्रवास करता येणार

कोव्हिडच्या वाढत्या संसर्गामुळे मागच्या सात-आठ महिन्यांपासून लोकल सेवा सामान्य नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आली होती. मात्र कालांतराने राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यावर मुंबईची लोकलसेवा केव्हा पूर्वपदावर येणार असा प्रश्न मुंबईकरांकडून विचारण्यात येत होता. मात्र सर्व सामान्य नागरिकांसाठी लोकल सेवा सुरु होण्यासाठी नवीन वर्ष उजाडणार असे संकेत बृहमुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहे.

सध्या मुंबई कोरोना रुग्ण कमी आढळून येत असले तरी मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका टळलेला नाही. त्यामुळे येत्या डिसेंबर अखेरपर्यंत कोरोनाच्या रुग्णसंख्येवर पालिका आरोग्य विभागाची नजर ठेवली जाणार आहे. यानंतरच लोकल सुरु करण्याबाबत राज्य सरकारला कळवले जाईल, अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त चहल यांनी दिली.

दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि गोवा या राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली आहे. त्यानंतर मुंबई महापालिका कोरोनाला हरवण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. मुंबईत कोरोना आटोक्यात आला आहे. येत्या २० डिसेंबरपर्यंत कोरोना परिस्थितीचा अंदाज घेण्यात येईल. तसेच नाताळ आणि नववर्षाचा विचार करुन लोकल सुरु करण्याबाबत विचार करु अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली आहे.

Leave a comment

0.0/5