Skip to content Skip to footer

‘एस्सेल ग्रुप’च्या कोविड हॉस्पिटलचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

‘एस्सेल ग्रुप’च्या कोविड हॉस्पिटलचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

‘एस्सेल ग्रुप’च्या कोरोना हॉस्पिटलचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व्हिसीच्या माद्यमातून आज दुपारी पार पडले. कोरोनाबाबत जनजागृती गरजेची असून लस आली तरी काळजी घ्यावीच लागणार आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलून दाखविले.

ठाण्यातील बोरीवडे मैदानात ३०० पेक्षा सास्त खाटांचे कोरोना रुग्णांसाठी हॉस्पिटल एस्सेल ग्रुपच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहे. उद्घाटनप्रसंगी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि झी एंटरटेंनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेडचे एमडी पुनीत गोयंका आदी मान्यवर उपस्थित होते. उडवली पुनीत गोयंका यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांचे आभार मानले.

आज झी समूहाच्या माद्यमातून कोरोना रुग्णाची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांनी मुख्यमत्र्यांचे आभार मानले. झी समूहाच्या माध्यमातून समाजासाठी एक चांगले काम करता आले आहे. हा बदल नक्कीच चांगला आहे. यातून चांगलेच परिवर्तन होण्यास महत्वपूर्ण बाब ठरणार आहे, असे झी एंटरटेंनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेडचे एमडी पुनीत गोयंका म्हणाले.

Leave a comment

0.0/5