Skip to content Skip to footer

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पत्राद्वारे सर्व शेतकऱ्यांना आवाहन

केंद्राने लागू केलेल्या नव्या कृषी कायदायाविरोधात मागच्या २३ दिवसांपासून शेतकरी राजधानी दिल्ली येथे मोदी सरकार विरोधात आंदोलन करत आहे. या संदर्भात शेतकरी संघटना आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चा सुद्धा झालेली आहे. मात्र अद्याप यावर तोडगा काढणे केंद्र सरकारला जमलेले नाही. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय कृषीमंत्र्यांनी लिहिलेले पत्र ट्विट केले असून शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे.

केंद्रीय मंत्री अमित शाह, पियूष गोयल, निर्मला सीतारमन तसंच भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर नरेंद्र तोमर यांच्याकडून हे पत्र प्रसिद्द करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. हेच पत्र पंतप्रधान मोदी यांनी नरेंद्र तोमर यांचे पत्र ट्वीट करून शेतकऱ्यांना वाचण्याचं आवाहन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले ट्विट

“कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी शेतकरी बंधू भगिणींना पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. नम्रपणे संवाद साधण्याचा एक प्रयत्न केला आहे. सर्व अन्नदात्यांनी हे पत्र वाचावं असा माझा आग्रह आहे. देशवासीयांना आग्रह आहे की, हे पत्र त्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावं,” असं नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पत्रामध्ये केंद्र सरकारने आपण शेतकऱ्यांसोबत खुलेपणाने चर्चा करण्यास तयार असल्याचं सांगितलं आहे. पण सोबतच विरोधकांच्या अजेंड्याचं मनोरंजन करणार नाही यावरही जोर दिला आहे. तर विरोधक शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप करताना सरकारने म्हटलं आहे की, “गेल्या २० ते २५ वर्षात कोणत्याही शेतकरी नेता किंवा संघटनेचं वक्तव्य दाखवा ज्यांनी शेतकऱ्यांना आपल्या मालाचा योग्य भाव मिळाला पाहिजे असं म्हटलं आहे”.

Leave a comment

0.0/5