Skip to content Skip to footer

कडवट शिवसैनिक..दिलदार दोस्त मोहन रावले गेले – संजय राऊत

शिवसेना नेते मोहन रावले यांचे आज सकाळी निधन झाले. मोहन रावले हे शिवसेनेचे माजी खासदार होते. तसेच ते दक्षिण मध्य मुंबईतून सलग पाच वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते निकटवर्तीय मानले जात होते. हृद्य विकाराच्या झटक्याने रावले यांचे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून मोहन रावले यांच्या अचानक जाण्यावर शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.

मोहन रावले गेले. कडवट शिवसैनिक..दिलदार दोस्त. शिवसेनेच्या अनेक आंदोलनात रक्त सांडलेले मोहन रावले अचानक सोडून जातील असे वाटले नव्ह्ते. “परळ ब्रँड “शिवसैनिक हीच त्याची ओळख. मोहन पाच वेळा खासदार झाला. पण अखेरपर्यंत तो सगळ्यांसाठी मोहनच राहीला, विनम्र श्रद्धांजली” असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

सलग पाच वेळा ते खासदार म्हणून दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघातुन निवडणून आले होते. पुरर्रचित मतदारसंघ झाल्यानंतर मात्र सन २००९ मध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून त्यांना पराभव पत्करावा लागला होता. तसेच मोहन रावले यांनी गिरणीकामगारांच्या न्याय्यहक्कांसाठी आंदोलने केली आहेत.

Leave a comment

0.0/5