Skip to content Skip to footer

होय मुंबईकर आणि महाराष्ट्रासाठी मी अहंकारी आहे – उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दुपारी १:०० वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधला यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर विरोधक असलेल्या भाजपकडून होत असलेल्या आरोपांना त्यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे.

अहंकारी राजा आणि विलासी पूत्र’ अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर केली जात आहे. कांजूरमार्ग मेट्रो प्रकल्पाच्या मुद्द्यावरुनही महाविकास आघाडी सरकार आणि पर्यायानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात आहे. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे “होय, मी मुंबईकर आणि महाराष्ट्रासाठी अहंकारी आहे,” अशा शब्दात जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

आरे मध्ये मेट्रो कारशेड उभारले असते तर पुढील ५ वर्षात आणखी जागेची गरज भासली असती. तेव्हा अजून मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करावी लागली असती. त्या तुलनेत कांजूर मार्गवरील जागा मोठी आहे. त्या जागेवर मेट्रो ३, मेट्रो ४ आणि मेट्रो ६ या लाईनचे कारशेडही होऊ शकते. ती जागा गवताळ आणि ओसाड आहे. त्याठिकाणी कारशेड झाल्यास पुढील ५० वर्षांसाठी वाढीव जागेची गरज भासणार नाही”, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे होता.

Leave a comment

0.0/5