Skip to content Skip to footer

लसीकरण साहित्य परत पाठवत शेतकऱ्यांनी केला भाजपा आमदाराला विरोध

केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी संघटनांच्या आंदोलनास आता ५० दिवसांपेक्षाही जास्त दिवस लोटले आहे. मात्र, यावर अद्याप तोडगा निघालेला नसल्याने हे आंदोलन सुरूच आहे. शेतकरी संघटना कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात गेले असून, न्यायालयाकडून चार सदस्यीय समिती देखील गठीत करण्यात आलेली आहे.

त्यात देशभरात आज कोरोनाला हरवणाऱ्या कोविशील्ड लसीच्या उद्घाटनाचा संभारंभ विविध ठिकाणी पार पडला होता. तसेच देशभरात कोरोना लसीकरण सुरू झाले आहे. मात्र हरियाणातील कैथल येथे कोरोना लसीकरण कार्यक्रमादरम्यान आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या आमदाराचा शेतकऱ्यांनी विरोध करत हाकलून लावले आहे.

यावेळी भारतीय किसान युनियन च्या शेतकऱ्यांनी हरियाणा सरकार मधील मंत्री, आमदार आणि राजकीय नेत्यांना ही लस पहिल्यांदा दिले जावे अशी मागणी केली. त्यामुळे एकीकडे सुरू असलेले शेतकरी आंदोलनाचा कोरोना लसीकरणावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच ग्रामीण भागात लसीकरण साहित्य परत पाठवून दिले. यावेळी समजावण्यासाठी लसीकरण केंद्रावर आलेल्या भाजपा आमदार लीलाराम यांना देखील शेतकऱ्यांनी विरोध करत हाकलवून लावले होते.

Leave a comment

0.0/5