Skip to content Skip to footer

“बेघरांना घरे देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध” – अब्दुल सत्तार.

“राज्यातील प्रत्येक बेघरास घर देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. तसेच शासकीय अधिकारी- कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी शासकीय क्वॉर्टर उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारची सकारात्मक भूमिका आहे.” असे प्रतिपादन महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.

सिल्लोड शहरातील पंचायत समितीच्या आवारातील जीर्ण झालेले क्वार्टर पाडून त्याठिकाणी सुसज्ज नवीन वसाहत निर्माण करून देण्यासाठी सत्तार यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी तत्काळ शासनास प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

नुकतेच शहरातील शेवंताबाई मंगल कार्यालयात ग्रामविकास विभागाअंतर्गत महाआवास योजनेसंदर्भात तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी उपस्थित शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करीत असताना अब्दुल सत्तार बोलत होते.

ते म्हणाले, “कोरोना संकटाची तीव्रता आपण सर्वांनी अनुभवली. हे संकट नव्यानेच ओढवले होते. अशा काळात परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता काम केले.” अशा शब्दात सत्तार यांनी सर्व शासकिय यंत्रणेची प्रशंसा केली.

Leave a comment

0.0/5