Skip to content Skip to footer

रावणाला आधार कार्ड किती मिळणार? UIDAI चं उत्तर व्हायरल

नवी दिल्ली : सध्या भारतातील प्रत्येक व्यक्तीला आधार कार्ड अतिशय महत्त्वाचं झालं आहे. नवजात बालकाचंही आधार कार्ड बनवलं जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर UIDAI च्या दसऱ्याच्या शुभेच्छा देणाऱ्या ट्वीटवर एका यूजरने रावणाला किती आधार कार्ड मिळणार असा? अजब प्रश्न विचारला आहे. त्यावरील UIDAI चं उत्तर कमालीचं व्हायरल झालं आहे.

वास्तविक, शनिवारी देशवासियांना दसऱ्याच्या शुभेच्छा देणारा एक ट्वीट UIDAI च्या अकाऊंटवरुन करण्यात आला. या ट्वीटला रिप्लाय देताना एका यूजरने रावणालाही आधार कार्ड बंधनकारक आहे का? आणि जर असेल, तर रावणाची 10 डोकी असल्याने त्याला 10 आधार कार्ड बनवावे लागतील का? असा अजब प्रश्न विचारला.

विशेष म्हणजे, आधार संदर्भातील यूजरच्या या प्रश्नावर UIDAI कडूनही उत्तर देण्यात आलं आहे. UIDAI ने यावर स्पष्टीकरण देताना म्हटलंय की, “रावणाला आधार कार्ड देता येणार नाही. कारण, तो भारताचा नागरिकच नाही.”

यूजरचा हा अजब प्रश्न, आणि त्यावरील UIDAI चं उत्तर सोशल मीडियावर कमालीचं व्हायरल होत आहे. UIDAI चा या ट्वीटला जवळपास 6 हजार पेक्षा जास्त यूजर्सनी लाईक केलं आहे. तर 4 हजारपेक्षा जास्त यूजरनी हा ट्वीट रिट्वीट केला आहे.

दरम्यान, रावणाच्या संदर्भातील प्रश्नाच्या अनुषंगाने काही जणांनी असेच अजब प्रश्न विचारले आहेत. एका यूजरने विचारलं की, दुर्गा देवीचेही हजारो हात आहेत. तर तिच्या किती बोटांचे ठसे घ्यावे लागतील?

अधिकमाहिती

Leave a comment

0.0/5