Skip to content Skip to footer

मंगेशकर असो की तेंडुलकर सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी झालीच पाहिजे – अमोल मिटकरी

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी होणार असे म्हंटल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसह अनेक भाजपा नेत्यांनी गृहमंत्र्यांवर जोरदार टीका केली होती. आता गृहमंत्र्यांसमर्थांत आमदार अमोल मिटकरी मैदानात उतरले आहे.

या संदर्भात मिटकरी ट्विट करून म्हणतात की, सेलिब्रिटींच्या ट्वीट ची चौकशी झालीच पाहिजे. मग मंगेशकर असोत की तेंडुलकर! ‘भारतरत्नांनी’ पदाला साजेसं असच बोलावं वागावं व लिहावं.फडणवीसांनी भारतरत्नांची बाजू घेताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर,डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनाचा आदर्श परिपाठ सुद्धा वाचुन घ्यावा. असे त्यांनी म्हंटले आहे.

पॉप सिंगर रिहानाने दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर, त्यावर प्रतिक्रिया देतांना अनेक सेलिब्रिटजनी ट्विट केलं होतं. परदेशी व्यक्तींनी बोलू नये, भारत एक आहे, देशातील प्रश्न आमचे आम्ही सोडवू अशा आषयाचे ट्विट लता मंगेशकर, सचिन तेंडुलकरसह दिग्गज सेलिब्रिटींनी केले होते. मात्र शेतकरी आंदोलनाबाबत सेलिब्रिटजच्या ट्विटमध्ये साधर्म्य दिसून येत असल्याचं सांगत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले होते.

Leave a comment

0.0/5