Skip to content Skip to footer

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सनराइझ रुग्णालयाला दिली भेट, अपघातास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश

महाराष्ट्र बुलेटिन : मुंबईच्या भांडुप येथील ड्रीम मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरील सनराइझ कोविड -१९ रुग्णालयात गुरुवारी रात्री उशिरा लागलेल्या आगीमुळे आतापर्यंत १० लोकांचा मृत्यू झाला आहे. अपघाताचे गांभीर्य पाहता स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्या ठिकाणी भेट दिली आहे. या दरम्यान त्यांनी अपघाताचे कारण जाणून घेतले आणि मृतांच्या नातेवाईकांसमोर शोक व्यक्त केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘कोरोनादरम्यान गरजेनुसार रुग्णालये बनवण्यात आली होती.’ रुग्णालय चालविण्याबाबत एनओसीवर उपस्थित झालेल्या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले की, हे नियमांनुसार चालत होते आणि रुग्णालय चालविण्यासाठी ३१ मार्चपर्यंत एनओसी देण्यात आली होती. तसेच त्यांनी रुग्णालयात घडलेली घटना अत्यंत वेदनादायक असल्याचे म्हटले.

यावेळी सीएम उद्धव ठाकरे यांनी अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. या अपघातास जबाबदार असणाऱ्यांना सोडले जाणार नाही आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

Leave a comment

0.0/5