Skip to content Skip to footer

ज्ञानेश्वर कटके यांचा ‘वाघोली पॅटर्न’ आता मुंबईमध्ये राबवला जाणार…

महाराष्ट्र बुलेटिन : सध्या दिवसेंदिवस वाढत चाललेली कोरोना रुग्णसंख्या बघता लसीकरण मोहिमेला वेग आलेला आहे. जेणेकरून या संकटातून नागरिकांना वाचवले जाईल. परंतु अनेक ठिकाणी लसीकरणाबाबत मोठी गैरसोय होत असून लसीकरण थांबलेल्या अवस्थेत आहे.मात्र दुसरीकडे पुण्यातील शिवसेना जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर आबा कटके यांचा वाघोली पॅटर्न चर्चेचा विषय ठरत आहे. ज्ञानेश्वर कटके यांनी वाघोलीमध्ये विविध सोसायट्यांमध्ये व नागरीवस्त्यांमध्ये जाऊन मोफत लसीकरण मोहीम राबविली आहे.

Wagholi Pattern कटके

त्यांच्या या मोहिमेमुळे ज्यांना लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेणे शक्य नव्हते अशा विविध वंचित घटकांना त्यांच्या दारातच लस मिळत आहे. त्यामुळे सर्वत्र त्यांच्या या कामाचे कौतुक होत आहे. अंध, अपंग, कामगार अशा सर्वांना मोफत लसीकरण त्यांच्या दारी उपलब्ध झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे.

आता ज्ञानेश्वर कटके यांचा वाघोली पटर्न फक्त वाघोली पर्यंतच मर्यादित राहिला नसून तो मुंबईत देखील राबविला जाणार आहे. आता मुंबईतील विविध सोसायट्यांमध्ये घरपोच मोफत लसीकरण उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे.

Leave a comment

0.0/5