Skip to content Skip to footer

कौतुकास्पद ! कृषिमंत्री दादा भुसे यांनी थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन घेतली माहिती…

महाराष्ट्र बुलेटिन : राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे हे सातत्याने शेतीशी संबंधित अनेक नवनवीन उपक्रम राबवताना आपल्याला दिसत असतात. खोट्या बी-बियाण्यांच्या बाबतीत तर त्यांनी अगदी ग्राउंड वरती जाऊन काम केले आहे हे आपल्या सर्वांना परिचित आहे. दरम्यान सध्या तर ते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीतील विविध बारकावे समजून घेत आहेत, जेणेकरून त्या दृष्टीने भविष्यात पाऊले उचलली जातील.

दादा भुसे हे अतिशय जबाबदार कृषिमंत्री म्हणून राज्यात काम करत असून शेतकऱ्यांच्या अनेक समस्या ते स्वतः शेतात जाऊन ऐकून घेत सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. त्यांनी नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील श्री. गंगाराम शिरोळे यांच्या शेतात जाऊन भेट दिली व तेथे उपस्थित अनेक शेतकऱ्यांशी शेतीसंबंधित विविध मुद्द्यांवर संवाद साधला.

आज कृषिमंत्र्यांनी ट्विट करत माहिती दिली की, “मालेगांव तालुक्यातील पांढरून शिवारातील श्री. गंगाराम शिरोळे यांच्या शेतात भेट देऊन कोबी पिकाची पाहणी केली. तसेच, येथील स्थानिक शेतकरी बांधवांशी कृषि विषयक बाबींवर चर्चा केली”. दरम्यान राज्याचे कृषिमंत्री थेट शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन तेथील माहिती घेऊन काम करत आहेत ही एक सकारात्मक बाब आहे.

Leave a comment

0.0/5