Skip to content Skip to footer

आमदार योगेशदादा कदम यांच्या विशेष प्रयत्नांनी मंडणगड शहरासाठी २.५० कोटींचा निधी मंजूर

महाराष्ट्र बुलेटिन : शिवसेना नेते व आमदार रामदासभाई कदम व दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम यांच्या विशेष प्रयत्नाने व सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मंडणगड शहरासाठी रुपये २.५० कोटी मंजूर करण्यात आले आहेत.

आमदार योगेशदादा कदम यांनी आज मंडणगड नगर पंचायत येथे यासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन प्रभाग निहाय मंजूर करून आणलेल्या कामांचा आढावा घेतला तसेच कागदपत्र पूर्तता प्रस्ताव वेळेवर गेला पाहिजे अशा सूचना देखील दिल्या.

सदर बैठकीस शिवसेना मंडणगड तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर, सभापती स्नेहल सकपाळ, शिवसेना शहरप्रमुख विनोद जाधव, उपशहरप्रमुख निलेश गोवळे, कार्यालयप्रमुख संतोष पार्टे, शिवसेना तालुका सचिव सिद्धेश देशपांडे, प्रविण जाधव, उपनगराध्यक्ष स्नेहल मांढरे, नगरसेवक बापू कोकाटे, नगरसेवक आदेश मर्चंडे, हरीशचंद्र निमदे, बने, जयराम राठोड, शहरातील विविध शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

 

Leave a comment

0.0/5