Skip to content Skip to footer

युवासेना सहसचिव मयूर कांबळे यांचा आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार, विविध जीवनावश्यक वस्तूंची केली मदत

महाराष्ट्र बुलेटिन : महाराष्ट्रात कुठेही नैसर्गिक आपत्ती आल्यास अवघा महाराष्ट्र एकवटून आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी उभा राहतो. सध्या कोकण व कोल्हपुरवर मोठे संकट आले असून लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. येथे आलेल्या पुरामुळे बंधु-भगिनींचे जीवन विस्कळीत झाले आहे, त्यांचे जीवन सुरळीत करण्याकरिता मुंबईतील सर्वजण मोठ्या प्रमाणावर मदत पाठवत आहेत.

अशाच एका उत्साही युवा समुदायाने देखील मुंबईमधून सामानाची जमवाजमव केली, परंतु ते पाठवायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिल्यावर त्यांनी युवासेना सहसचिव मयूर कांबळे यांच्याशी संपर्क साधला व मदतीचे सामान पाठवण्याची व्यवस्था करण्यासंदर्भात संवाद साधला. दरम्यान त्यांच्या माध्यमातून जमवलेले सामान हे पुरग्रस्तांपर्यंत पोहोचले आहे.

 

युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशाने आणि युवासेना सहसचिव वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनाचे सर्व पदाधिकारी यथाशक्ती पुरग्रस्तांना मदत करण्याचे कर्तव्य पार पाडत आहेत. याच कर्तव्याचा एक भाग म्हणून मयूर कांबळे यांनी जमा केलेल्या सामानात मोठी भर स्वतःकडून घातली तसेच सामानाची सुयोग्य बांधाबांध करुन ट्रकद्वारे ते पुरग्रस्त चिपळूण भागात पोहोचण्याची देखील व्यवस्था करून दिली. या उपक्रमामध्ये प्रथमेश सावर्डेकर, सौरभ वैंगणकर, राहुल चिपळुणकर, मनीष यादव, महेश पाटील यांनी सक्रिय योगदान दिले.

Leave a comment

0.0/5