Skip to content Skip to footer

सिद्धेश कदम यांच्या संकल्पनेतून मुबंईत तब्बल १० हजार दुर्मिळ देशी झाडांची होणार लागवड

महाराष्ट्र बुलेटिन : राज्याचे पर्यावरण मंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत उत्तर मुंबईत १० हजार दुर्मिळ देशी प्रजातींच्या वृक्ष लागवडीचा अनोखा उपक्रम युवासेना कार्यकारिणी सदस्य सिद्धेश कदम व मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य शशिकांत झोरे यांच्या संकल्पनेतून साकार होत आहे. या पर्यावरणीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या अशा उपक्रमाचे उद्घाटन नुकतेच महापौर किशोरी पेडणेकर आणि उपमहापौर सुहास वाडकर यांनी बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापासून केले.

विशेष म्हणजे या मोहिमेचा हेतू केवळ वृक्षारोपण अशी संकल्पना न राबवता देशात दुर्मिळ होत चाललेल्या विविध १० हजार प्रकारच्या प्रजातींचे संवर्धन करण्याचाही आहे. या उपक्रमाचे दायित्व तरुण वर्गाकडे सोपवले तर त्यांच्यासाठी देखील ही अभिमानाची बाब ठरणार आहे. म्हणूनच ही संकल्पना प्रत्यक्षात साकारण्याचे ठरवले गेले, अशी माहिती सदर कार्यक्रमाचे आयोजक सिद्धेश कदम यांनी दिली.

यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, उपमहापौर सुहास वाडकर, आमदार-विभागप्रमुख विलास पोतनीस, आमदार प्रकाश सुर्वे, शिवसेना प्रवक्त्या संजना घाडी, नगरसेवक संजय घाडी, रिद्धी खुरसंगे, गीता सिंघण, विभाग संघटक सुजाता शिंगाडे, विधानसभा प्रमुख उद्देश पाटेकर, चेतन कदम, शुभदा शिंदे, शीला गांगुर्डे, युवा विभाग अधिकारी विजय रांजणे, अमित मोरे, प्रतीक्षा सावंत तसेच शिवसेना युवासेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a comment

0.0/5