Skip to content Skip to footer

पुण्यात रिक्षाभाडे महागणार

पुणे: पुणे शहर परिसरात रिक्षा भाड्यात अंदाजे तीन रूपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. भाडेवाडी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावर एक मताने निर्णय सांगण्यात आले, मात्र येत्या दोन दिवसात याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

शहरात 2015 नंतर शेवटचे रिक्षा भाडेवाढ झाली होती. त्यानंतर भाववाढ झालेली नाही मध्यंतरी कोरोनाचे संकट आल्याने हा विषय लांबणीवर पडला होता. मात्र कोरोनाचे नियम शिथिल केल्यानंतर रिक्षा संघटनांनी भाडे दर वाढवण्याची मागणी केली होती.

या पार्श्वभूमीवर रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चेसाठी बैठक पार पडली या बैठकीला विविध 15 रिक्षा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a comment

0.0/5