Skip to content Skip to footer

Gold Price Today: सोन्यामध्ये तेजी, चांदीही महागली, जाणून घ्या आजच्या नवीन किंमती

महाराष्ट्र बुलेटिन : आज भारतीय बाजारात सोन्याच्या भावात मोठी वाढ नोंदली गेली. दिल्ली सराफा बाजारामध्ये सोमवारी म्हणजेच १ मार्च २०२१ रोजी सोन्याच्या किमतीमध्ये प्रति १० ग्रॅम २४१ रुपयांची वाढ झाली. त्याचबरोबर चांदीच्या किंमतीही आज वाढल्या. गेल्या व्यापार सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम ४५,२७९ रुपयांवर बंद झाले होते. त्याचबरोबर चांदी ६८,०९६ रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही आज सोन्या-चांदीच्या किंमती वाढल्या.

सोन्याच्या नवीन किंमती

दिल्ली सराफा बाजारामध्ये सोन्याच्या किंमती सोमवारी प्रति १० ग्रॅम २४१ रुपयांनी वाढल्या. राजधानी दिल्ली मध्ये ९९.९ ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याची नवीन किंमत आता प्रति १० ग्रॅम ४५,५२० रुपयांवर पोहोचली आहे. यापूर्वी व्यापार सत्रात सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम ४५,२७९ रुपयांवर बंद झाले होते. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत आज वाढून १,७५३ डॉलर प्रति औंसवर पोहोचली.

चांदीच्या नवीन किंमती

चांदीच्या किंमतीमध्ये सोमवारी चांगली वाढ नोंदवण्यात आली. दिल्ली सराफा बाजारामध्ये आता या मौल्यवान धातूची किंमत ७८१ रुपयांनी वाढून ६८,८७७ रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीची किंमत प्रति औंस २६.९० डॉलरवर पोहोचली.

सोन्यामध्ये तेजी का नोंदवण्यात आली?

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या म्हणण्यानुसार आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमत वाढीचा परिणाम भारतीय बाजारावरही दिसून आला आहे. त्याचबरोबर डॉलरच्या तुलनेत रुपया आज १६ पैशांच्या मजबुतीसह व्यापार करीत होता. यामुळे दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत तेजी दिसून आली.

Leave a comment

0.0/5