Skip to content Skip to footer

शेअर बाजार – बॅंकिंग शेअर्समध्ये तेजी

मुंबई – सार्वजनिक बॅंकांमधील विलीनीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने तत्त्वत: मंजुरी दिल्यानंतर शेअर बाजार त बॅंकांच्या शेअर्सची मागणी वाढली. बॅंकिंग शेअरमध्ये आलेल्या तेजीने सेन्सेक्‍स २७६ अंशांच्या वाढीसह ३१, ५६८ अंशांवर बंद झाला. निफ्टीही ८६.९५ अंशांच्या वाढीसह ९ हजार ८५२ अंशांवर बंद झाला.

सेन्सेक्‍समध्ये २७६ तर निफ्टीत ८६.९५ अंशांची वाढ

https://maharashtrabulletin.com/insurance-unclaimed-amount/

मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर बॅंकिंग शेअरची मागणी वाढली. पंजाब नॅशनल बॅंक, बॅंक ऑफ बडोदा, अलाहाबाद बॅंक, युनियन बॅंक आदी शेअरची गुंतवणूकदारांनी खरेदी केली. बॅंकिंग शेअर बरोबरच आयटी आणि रियल्टी शेअर्सला मागणी दिसून आली. संस्थापक नंदन निलेकणी पुन्हा संचालक मंडळावर येण्याच्या शक्‍यतेने गुंतवणूकदार इन्फोसिसच्या शेअर खरेदीकडे वळाले. इन्फोसिस सलग दुसऱ्या दिवशी १.९८ टक्‍क्‍यासह ८९४.५० रुपयांच्या पातळीवर बंद झाला. अदानी पोर्ट, भारती एअरटेल, डॉ. रेड्डी, डीएलएफ आदी शेअर वधारले. एसबीआय, आयसीआयसीआय बॅंक, टाटा स्टील, टाटा मोटर्स, एनटीपीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज तेजीसह बंद झाला. रियल्टी निर्देशांक ३.४८ टक्‍क्‍यांनी वधारून बंद झाला. स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअर्समध्ये खरेदीचा ट्रेंड दिसून आला. शेअर बाजाराच्या माहितीनुसार स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ४३५.०५ कोटींची खरेदी केली. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (एफपीआय) मात्र विक्रीच्या मूडमध्ये आहेत. ‘एफपीआय‘ने ८२८.६९ कोटींची विक्री केली आहे. निफ्टी मंचावर रियल्टी, पीएसयू बॅंक, मेटल, फायनान्शिअल सर्व्हिसेस, एफएमसीजी आदी निर्देशांकात वाढ झाली.

अवश्य वाचा – Infosys मध्ये परतण्यासाठी नंदन निलेकणी इच्छुक

रुपयाचे अवमूल्यन
चलन बाजारात रुपयात दोन पैशांचे अवमूल्यन झाले. दिवसअखेर तो ६४.१२ वर बंद झाला. बॅंका आणि कॉर्पोरेट्‌सकडून डॉलरची मागणी वाढल्याने रुपयाला झळ बसल्याचे चलन बाजारातील विश्‍लेषकांनी सांगितले.

अधिक वाचा

Leave a comment

0.0/5