देशातील एक आघाडीची म्युच्युअल फंड कंपनी असलेल्या एचडीएफसी ॲसेट मॅनेजमेंट कंपनीची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) २५ ते २७ जुलैदरम्यान होणार आहे. यासाठी कंपनीने १०९५ ते ११०० रुपयांचा ‘प्राईस बॅंड’ जाहीर केला आहे. एकूण २.५५ कोटी शेअर विक्रीसाठी उपलब्ध करून २८०० कोटी रुपये उभारण्याचा कंपनीचा मानस आहे. गुंतवणूकदारांना कमीत कमी १३ इक्विटी शेअर आणि त्यानंतर १३ च्या पटीत शेअर घेण्यासाठी अर्ज करता येणार आहे.