Skip to content Skip to footer

दावा न केलेला इन्श्‍युरन्स दहा हजार कोटींचा 

मुंबई – बंदावस्थेतील बॅंक खाती, इलेक्‍ट्रॉनिक पेमेंटचा मर्यादित वापर, संपर्काची किमान साधने आणि विमा दाव्यासंदर्भातील माहिती न मिळाल्याने लाखो ग्राहकांनी दावा न केलेली विमा रक्कम १० हजार ४६९ कोटींपर्यंत वाढली आहे. विमा सेवा देणाऱ्या मॅक्‍स लाइफ इन्श्‍युरन्स वगळता इतर २२ कंपन्यांच्या दावा न केलेल्या रकमेत वर्षभरात मोठी वाढ झाली आहे.

https://maharashtrabulletin.com/sarahah-application-install-and-use/

सर्वसाधारणपणे कंपनीने धनादेश पाठवल्यानंतर केवळ एक चतुर्थांश ग्राहक धनादेश बॅंकेत जमा करत असल्याचे अंतर्गत माहितीत दिसून आले. मॅक्‍स लाइफने याबाबत सर्वेक्षण केले आहे. दाव्याचा परतावा न केलेल्या रकमेच्या ७५ टक्के रक्कम अशी आहे, ज्याचे धनादेश सहा महिन्यांपूर्वीच पाठवले आहेत.

यावर वित्त, वितरण आणि प्रचलन या तीन विभागांतील सदस्यांची समिती तयार करून दावा न केलेल्या ग्राहकांचा शोध घेतला. या उपाययोजनेमुळे ३१ मार्चपर्यंत ग्राहकांतर्फे दावा न केलेली रक्कम ५० कोटींपर्यंत कमी झाल्याचे मॅक्‍स लाइफ इन्श्‍युरन्सचे वरिष्ठ संचालक आणि मुख्य वित्त अधिकारी प्रशांत त्रिपाठी यांनी सांगितले.

अधिक वाचा

Leave a comment

0.0/5